Headlines

पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेचे पाद्यपूजन:प्रकारावरून वाद, 'आप'कडून चौकशीची मागणी




पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेत गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून भाजपच्या नगरसेविका स्वाती लोखंडे यांचे पाद्यपूजन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून टीका होत असून, आम आदमी पार्टीच्या (आप) पालक युनियनने या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. शाळेत आयोजित गुरु पौर्णिमा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नगरसेविका स्वाती लोखंडे यांच्या पायांवर पाणी घालून पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन केले. या कार्यक्रमावेळी शिक्षक आणि शाळेचे अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे शैक्षणिक मूल्यांचे उल्लंघन झाल्याची टीका केली जात आहे. आम आदमी पार्टीच्या पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यासारख्या शहरात लोकप्रतिनिधींचे विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन करून घेणे हे अयोग्य, अशास्त्रीय आणि कर्मकांडाला प्रोत्साहन देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलांना अशा कृती करण्यास प्रवृत्त करणे चुकीचे असून, पालकही याला मूकसंमती देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. किर्दत यांनी पुढे नमूद केले की, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून नगरसेवकांनी पालिका शाळांचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला पाहिजे. भाजपचेच लोकप्रतिनिधी पालिका शाळांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करतात, मात्र अशा प्रतीकात्मक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या घटनेबाबत शिक्षण विभाग आणि भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *