Headlines

पुण्यात नक्षली हिडीमाच्या समर्थनार्थ नृत्यावर अभाविपचा तीव्र निषेध:स्वारगेट चौकात हिडीमाचा पुतळा जाळून कारवाईची मागणी




पुण्यातील विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात नक्षलवादी कमांडर हिडीमाच्या समर्थनार्थ केलेल्या नृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) स्वारगेट चौकात आंदोलन केले. यावेळी नक्षलवादी कमांडर हिडीमाचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अभाविपने वसतिगृहातील विद्यार्थी, गृहपाल आणि अधिकारी यांच्यावर देशविरोधी कारवाई आणि त्याला पाठबळ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही अभाविपच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात अभाविपचे पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, सहमंत्री आलोक पवार आणि अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात घडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवादी कमांडर हिडीमाच्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की त्यांनी ‘हिडीमा’ नव्हे, तर ‘पर्व’ असा उल्लेख केला होता. मात्र, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. माडवी हिडीमा हा छत्तीसगडमधील एक कुख्यात नक्षलवादी कमांडर होता. त्याच्यावर सुरक्षा दलांच्या जवानांच्या हत्येचे अनेक गंभीर आरोप होते. वयाच्या १६ व्या वर्षी तो नक्षलवाद्यांसोबत गेला आणि नंतर नक्षलवाद्यांचा सर्वात क्रूर कमांडर बनला. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते आणि तो एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका चकमकीत तो मारला गेला होता. अशाप्रकारे क्रूर हीडमाचे पुन्हा एकदा गाण्याच्या माध्यमातून उद्दतीकरण होत असल्याचा आरोप अभाविप ने केला आहे. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन करून याबाबत इशारा देखील दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *