![]()
शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपरिषद कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून शोषित व वंचित माणसांचे दुःख मांडले असून, त्यांच्या साहित्यातून पराभूत नव्हे तर नेहमी लढाऊ माणूस पुढे आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी रवींद्र लांडे हे होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानले होते, तोच विचार व वारसा आजच्या तरुण पिढीने स्वीकारावा, तरच समाजात खरी परिवर्तन क्रांती होईल. नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी मनोगतात सांगितले की, शिक्षण घेऊन अण्णाभाऊंच्या वारसदारांनी उच्च पदांवर पोहोचण्याची गरज आहे. यावेळी उद्योगपती मनोज पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित कणगरे यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक शिवकुमार जयस्वाल, दीपक घाडगे, अमोल जाधव, किरण सोनवणे, कृष्णा जाधव, कचरू घाडगे, सुरेश इचके, मंगेश मावस, आकाश मावस, गजानन साळवे, सुमन घाडगे, शांताबाई इचके, कडूबाई सोनवणे आदी उपस्थित होते.
Source link
कन्नड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी:अण्णा भाऊंच्या लेखणीतून लढाऊ माणूस पुढे आला- अब्दुल जावेद