Headlines

गोदावरी नदीच्या पुराने 15 गावांचा संपर्क ठप्प:कमलपूर केटी वेअर पुन्हा पाण्याखाली, विसर्गामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला‎




गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळपासून वैजापूर-श्रीरामपूरला जोडणारा कमलपूर के.टी. वेअर पाण्याखाली गेला असून वाहतूक सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. परिणामी गोदाकाठावरील १५ गावांचा संपर्क तुटल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर बाजारपेठ, शिक्षण व आरोग्य सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना वळसा घालावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कमलपूर के.टी. वेअरवरील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून काही भागात मोठे तडे गेले आहेत. ४९, ४५० क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी ^गोदावरी नदीत सध्या ४९ हजार ४५० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे कमलपूर के.टी. वेअर पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व पाण्यातून वाहतूक करण्याचा प्रयत्न करू नये. – सचिन ससाणे, उपअभियंता, नांदूर-मध्यमेश्वर पाटबंधारे विभाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *