![]()
श्रीगोंदे शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे ससाणेनगर मित्र परिवाराच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनकल्याणकारी उपक्रमांनी सजलेल्या या उत्सवात नागरिकांचा सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन व ध्वजारोहण करून झाली. यावेळी श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन बापूसाहेब गायकवाड, उपनगराध्यक्षा अलका अनुभुले, नगरसेविका आरती शिरवाळे, संग्राम घोडके, अरविंद कापसे उपस्थित होते. खासदार नहलेश लंके यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या वेशभूषेतील देखावे होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा ससाणे, उपाध्यक्ष प्रकाश ससाणे तसेच समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. वृद्धेश्वर बँकेचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या वतीने ससाणेनगर येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक अनिल औटी, टिळक भोस, नाना शिंदे, नीलेश गायकवाड, हरिदास शिर्के, नगरसेवक दादासाहेब औटी, भगवराव गोरखे, संदीप उमाप, कुणाल शिरवाळे आदी उपस्थित होते.
Source link
श्रीगोंद्यात अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष:महापुरुषांच्या वेशभूषेतीलदेखावे ठरले आकर्षण