Headlines

धनश्री प्रवचनमाला:द्वंद्वरहित कान्होपात्रेचा आधार पांडुरंग, तिसऱ्या पुष्पात ॲड. जयवंत बोधले महाराजांचे निरूपण‎




द्वंद्वारहित असणारी ही कान्होपात्रा आपला आधार म्हणजे पांडुरंग आहे, असे स्पष्ट सांगते आहे. कान्होपात्रेच्या दृष्टीने पंढरपूर हेच माहेर आहे, हे सांगताना कान्होपात्रा त्याची कारणमीमांसा करते तो अभंग असा, या अभंगात सुखाने राहणे ते माहेर, ताप जाणे ते माहेर, व्यथा निवृत होणे ते माहेर, तृप्त होणे ते माहेर, असे माहेर शब्दाचे वर्णन केले आहे. कान्होपात्राचे माहेर हे पंढरी आहे, असे सांगताना वरील सर्व गोष्टी जर एखाद्या स्त्रीला तिच्या सासरमध्ये मिळत असतील तर तिच्या दृष्टीने ते माहेरच आहे, असे विचार संत कान्होपात्रा अभंग चिंतन “याचे विवेचन करताना ॲड. जयवंत बोधले महाराज यांनी मार्मिक शब्दांत केले. ते मंगळवेढा येथील श्रीराम पॅलेस येथे स्व. सौ. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ आयोजित प्रवचनमालेत तिसरे पुष्प गुंफताना रविवारी सायंकाळी बोलत होते. कान्होपात्रा माझे माहेर पंढरी म्हणते याचा अर्थ कान्होपात्रा तृप्तीच्या एका वृत्त शिखरावर आहे,विषयाची तृप्ती आणि भक्तीची तृप्ती याच्यामध्ये मध्ये फरक आहे, विषयाची तृप्ती ही क्षणिक असते भक्तीची तृप्ती कायमस्वरूपी असते, कान्होपात्राच्या घराण्यातून येते, ज्या व्यवसायातून येते या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर क्षणिक तृप्ती नको आहे म्हणून ती वारकऱ्यांच्या संगतीने निघाली आहे आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर जी स्थिती होते ती स्थिती म्हणजे तृप्त स्थिती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *