.

उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आलेली असून, रविवारी इशारा पातळी ओलांडलेल्या भीमेचा पूर ओसरू लागला आहे. मात्र शनिवारी रात्री नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे.
उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातून एक लाख ५,९७९ क्यूसेक्सने पाण्याचा प्रवाह सुरू असून चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे.
पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत रायगड भवन, पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रतिनिधी | टेंभुर्णी दोन दिवसापासून घाट माथ्यासह भीमा खोऱ्यात मंगळवारपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर दौंडमध्ये येणारा विसर्ग जैसे थे ३८,९०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. बंडगार्डन २३,६९३ क्यूसेकने सुरू आहे. उजनीतून शनिवारी सोडण्यात आलेल्या ९० हजारांत ३० हजार क्यूसेकने घट करून रविवारी सायंकाळी ६० हजार क्यूसेकने सुरू ठेवल्याने पंढरपूर शहरासह नदीकाठी उद्भवणारी पूरस्थिती तूर्तास तरी टळली आहे. उजनी धरणात एकूण पाणीसाठा ११५.९९ टीएमसी झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ५३.३३ टीएमसी ९७.६८ टक्के झाला आहे. वीर धरणातून ही ६३ हजार क्यूसेकने पाणी सोडल्याने नीरा नरसिंहपूर येथे १ लाख ३० हजार क्यूसेकने चालू राहिल्याने व वरील उजनी धरण साखळीतील १६ धरणांतून १ लाख ५० हजारने पाणी दौंडकडे येत होते. हे पाणी पोहचण्याआगोदर पूर नियंत्रणासाठी उजनीतून पाणी सोडले आहे. यामुळे उजनीच्या पाणीपातळी घट झाली आहे. रविवारी पाणी ओसरेल.
पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. या स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केली. या वेळी नगराध्यक्ष, मंदिर समितीच्या सदस्या डॉ. प्रणिता भालके यांनी भोजन व्यवस्थेची पाहणी केली. उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी केल्याने पंढरपुरातील भीमा नदीची पाणी पातळीही कमी होणार सुरुवात झाली आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. पाणी ओसरणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.