Headlines

पवईत 'हेवी डिपॉझिट'च्या नावाने गंडा:एकाच घरासाठी 17 जणांसोबत भाडेकरार नामा; सव्वा कोटींची फसवणूक, घरमालकावर गुन्हा




मुंबईतील पवई परिसरातील तुंगा गावात घरभाड्याच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका भामट्या घरमालकाने स्वतःचे एकच घर तब्बल 17 जणांना भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाखाली सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून पवई पोलिस ठाण्यात आरोपी घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घरमालकाने भाडेकरूंकडून ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाने प्रत्येक भाडेकरूकडून तब्बल 6 लाख रुपयांचे डिपॉझिट घेतले. कागदोपत्री घर भाड्याने देण्याचा रीतसर करार केला.. मात्र, करारात नमूद केल्यानुसार प्रत्यक्ष घराचा ताबा न देता, भाडेकरूंना दरमहा ठराविक रक्कम व्याजाच्या किंवा परताव्याच्या स्वरूपात दिली जात होती. सुरुवातीला दरमहा वेळेवर परतावा मिळत असल्याने भाडेकरूंना यामागील मोठा बनाव लक्षात आला नाही. या पद्धतीचा वापर करून आरोपीने तब्बल 17 जणांना आपल्या जाळ्यात ओढले आणि सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातला. बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे फुटला भांडाफोड एका पीडित दाम्पत्याला घरमालकाच्या वागणुकीचा संशय आला. त्यांनी सत्यता पडताळण्यासाठी थेट तुंगा गावातील संबंधित घराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्या घराच्या दरवाजावर बँकेची जप्तीची नोटीस चिकटवलेली पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरमालकाने या मालमत्तेवर बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते आणि त्याचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने या मालमत्तेवर जप्तीची कायदेशीर कारवाई सुरू केली होती. बँक जप्तीची नोटीस पाहिल्यानंतर भाडेकरूंना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच 17 जणांसोबत हा करार झाल्याचे समोर आले आहे. पवई पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास तीव्र फसवणूक उघडकीस आल्यानंतर सर्व संतप्त पीडितांनी एकत्र येत थेट पवई पोलिस ठाणे गाठले आणि घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत आणखी किती नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे? तसेच भाडेकरूंकडून उकळलेली सव्वा कोटी रुपयांची रक्कम आरोपीने कुठे गुंतवली किंवा खर्च केली? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. हे ही वृत्त वाचा पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या असणाऱ्या सदाशिव पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात चक्क एका भरधाव पोलिस व्हॅननेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *