Headlines

लोकांचा जीव जातोय, ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे?:गडकरींनी अमेरिकेसारखे सोडा, किमान श्रीलंकेसारखे रस्ते करून दाखवावे- अविनाथ जाधव




मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे जर लोकांचा मृत्यू होत असेल तर ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. काल एका महिलेचा आणि आज TDRF पथकातील जवानाचा या खड्ड्यांमुळे जीव गेला आणि तरीही पालकमंत्री, बांधकाम मंत्री आणि सरकारला जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला असेही जाधव यांनी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अविनाश जाधव म्हणाले की, सत्ताधारी केवळ आमदार-खासदार फोडण्यातच व्यस्त राहणार आहेत का? भिंवडी रोडची परिस्थिती पाहिली तर लोकं बोटं घेऊन आंदोलन करत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. नितीन गडकरी म्हणाले होते की अमेरिकेसारखे रस्ते करू त्यांनी किमान श्रीलंकेसारखे रस्ते करावे, अमेरिका खूप दूर राहिली. दरवर्षी पावसाळा आला रस्त्याला खड्डे पडतात आणि टेंडर निघतात. पोलिस खड्डे बुजवताय, कंत्राटदार कुठे? अविनाश जाधव म्हणाले की, काहीशे कोटी रुपयांचे टेंडर खड्डे बुजवण्याचे निघत असेल आणि तरी खड्डे बुजत नसतील तर हे टेंडर काढतात आणि कामे करतात की पैसे घरी घेऊन जातात? असा सवाल जाधव यांनी केला आहे. ज्यांना हे काम मिळाले तो खड्डे बुजवण्याचे काम करतो का? पोलिस खड्डे बुजवताना दिसून येतात मग कंत्राटदार कुठे आहे? आमचे पालकमंत्री गायब आहेत. ठाण्यात अनेक प्रश्न आहेत त्यावर आमचे पालकमंत्री बोलताना दिसून येत नाही. ते खूप मोठे आहेत पण मोठे होत असताना ज्या लोकांनी मोठे त्यांना विसरु नका ना. आज इतकी लोकं जर रस्त्यात पडून मरणार असतील तर यापेक्षा दुर्भग्याची बाब ठाण्यासाठी दुसरी काही नसेल. येणाऱ्या काळात ठाणेकरांना 5 टोलचा विळखा अविनाश जाधव म्हणाले की, येणाऱ्या काळात सण आहेत त्यामध्ये बाळगोपाळ आणि गणेशभक्त जावू नये याची सरकारने आणि प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. मुंबई ते नागपूर जाण्यासाठी समृद्धी महामार्गावर आम्हाला 1800 रुपये टोल द्यावा लागतो. सरकारने टॅक्स वसून करते त्या पैशातून आम्हाला काय देत आहे? जितके मोठे रस्ते येत आहेत त्याला टोल आहे. ठाणेकरांना येणााऱ्या काळात 5 टोलचा विळखा पडणार आहे. नवीन टेंडर काढणं आणि टक्केवारी वसूल करणे हेच काम सुरू आहे लोकांशी त्यांना काही देणंघेणं नाही. जे रस्ते तयार केले आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती खराब झाली आहे. हे ही वृत्त रिराईट करा भ्रष्टाचाराच्या खड्ड्यांनी घेतला देवदूताचा बळी!:TDRF जवानाच्या मृत्यूनंतर रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, सखोल चौकशीची मागणी
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (TDRF) जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर आणि महामार्गाच्या निकृष्ट कामावर सडकून टीका केली आहे. हा मृत्यू नसून ‘भ्रष्टाचाराच्या खड्ड्यांनी’ घेतलेला बळी असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *