Headlines

Bhiwandi-Thane Highway Potholes Death; TDRF Jawan & Woman Killed in Accidents


मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (TDRF) जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर आणि मह

.

‘देवदूताला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात प्राण गमवावे लागले’

रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील इमारत दुर्घटनेत या जवानाने बजावलेल्या कामगिरीची आठवण करून देत ते म्हणाले, “मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळं झालेल्या अपघातात TDRF जवान विकास गोरे यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आहे. याच जवानाने भिवंडी इमारत दुर्घटनेत ‘देवदूत’ म्हणून अनेकांचे प्राण वाचवले होते. पण, दुर्दैवाने मुंबई-नाशिक महामार्गावरील भ्रष्टाचाराच्या खड्ड्यांत त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, हे अत्यंत वेदनादायी आहे.”

सखोल चौकशीची आणि न्यायाची मागणी

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, पवार यांनी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. या घटनेबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “या अपघाताची आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तत्काळ सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच, ज्या कुटुंबावर हे मोठे दुःख कोसळले आहे, त्या कुटुंबाला सरकारने तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.”

खड्ड्यात दुचाकी घसरली अन् महिलेला ट्रकने चिरडले

दरम्यान, दुसरी हृदयद्रावक घटना ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत घडली. ठाण्यातील मनोरमा नगर येथे राहणाऱ्या सुनिता अक्षयलाल पाल (वय ४६) या त्यांचे पती अक्षयलाल पाल यांच्यासोबत ॲक्टिवा दुचाकीवरून अंजूर फाटा येथे फ्लॅट पाहण्यासाठी निघाल्या होत्या.

राहणाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट खड्ड्यात जाऊन घसरली. या अपघातात पती अक्षयलाल हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले, मात्र सुनिता या रस्त्याच्या मधोमध पडल्या. दुर्दैवाने, त्याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने सुनिता यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा..

खड्ड्यांवरून टीकेनंतर गिरीश महाजनांची ग्वाही:8 दिवसांत खड्डे बुजवणार, 4 महिन्यांत नाशिकचे सर्व रस्ते काँक्रीटचे

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत असतानाच आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील आठ दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील, तर चार महिन्यांत प्रमुख रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण होतील. त्यानंतर किमान 40 वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. रविवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.