Headlines

पुणे मनपा उत्पन्नवाढीसाठी संयुक्त समिती स्थापन:2026-27 साठी 15 हजार 669 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर, उद्दिष्टपूर्तीवर भर




पुणे महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १५,६६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत मंजूर झाले आहे. या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सदस्य व प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. या समितीत स्थायी समितीतील निवडक सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह विशाल धनावडे, संदीप बेलदरे, रुपाली धाडवे, मयुरी कोकाटे, प्रशांत जगताप आणि सुहास टिंगरे यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच संबंधित विभागांचे खातेप्रमुख यांचाही या समितीत समावेश असेल. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करसंकलन सुधारणा, थकबाकी वसुली, नवीन महसूल स्रोतांचा शोध आणि विविध आर्थिक उपाययोजनांचा आढावा घेणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे. या समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीला बळकटी देत अंदाजपत्रकातील उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी उदया (दि. १७) दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय आणि येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समितीच्या पुर्नरचनेबाबत पालिका प्रशासनाचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणुका स्थगित कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेनुसार पक्षीय बलाबलानुसार १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसला एक प्रभाग समिती मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *