Headlines

Karuna Munde Attacks Pankaja and Dhananjay Munde Over Political Exit Statements | Beed Politics | BJP


बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘राजकीय निवृत्ती’ आणि ‘एक्झिट’ या शब्दांची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी अलिकडेच राजकारणातील गलिच्छपणा आणि वैतागातून निवृत्तीबाबत सूचक वक्तव्ये केली होती. यावर आता करुणा शर्मा य

.

मुंडे बहीण-भावाच्या वक्तव्याचा समाचार घेताना करुणा शर्मा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “तुम्ही दोघांनीच आतापर्यंत गलिच्छ राजकारण केले आहे. जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेचा गैरवापर करत हत्या आणि खंडणीसारखे प्रकार केले. जर तुम्हाला राजकारणातून खरोखरच ‘एक्झिट’ घ्यायची असेल, तर परळीत तुमची भव्य निरोप सभा मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आयोजित करते. माझ्याकडून तुमच्या एक्झिटला पूर्ण पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या.

२०२९ च्या निवडणुकीचा इशारा

करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या, “तुमच्या जागेवर मी स्वतः काम करून दाखवते. तुम्ही मला पाठिंबा द्या. २०२९ च्या निवडणुकीत मी उभी राहीन आणि जिंकून येऊन लोकांसाठी कसे काम करावे लागते, त्यांची गरज काय असते, हे मी दाखवून देईन.”

धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले होते?

माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर खंत व्यक्त केली होती. “सध्या अतिशय गलिच्छ पातळीवर जातीपातीचे राजकारण केले जात आहे. हे पाहून आमच्यासारख्या माणसाला अनेकदा राजकारणात राहावे की नाही, असा प्रश्न पडतो. केवळ महापुरुषांचे विचार आणि त्यांनी दिलेली समतेची शिकवण पाठीशी असल्यानेच, उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी या राजकारणात टिकून आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले होते.

पंकजा मुंडेंचे ‘समृद्धी एक्झिट’चे वक्तव्य

दुसरीकडे, परळीतील एका कवी संमेलनात आणि बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पंकजा मुंडे यांनीही निवृत्तीचे संकेत दिले होते. “या खराब रस्त्यावरून खडखड करत आले आणि माझ्या पीएला (PA) म्हणाले की, आता खूप कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. माझे राजकारण जर माझ्या विचारांशी समरस वाटले नाही, तर जसा ‘समृद्धी महामार्गा’वर एक्झिट असतो, तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो यासाठी तयार असतो, तोच अशा पद्धतीने राजकारण करू शकतो,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

बीडच्या राजकारणात चर्चांना उधाण

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या सलग वक्तव्यांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ‘एक्झिट’च्या राजकारणावरून सुरू झालेल्या या शाब्दिक संघर्षामुळे आगामी काळात परळी आणि बीडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा…

धनंजय मुंडेंच्या विधानावर मनोज जरांगेंची टीका:म्हणाले- उशीरा शहाणपण आलं, आता मराठ्यांच्या नादी लागू नका अन् गुन्हेगारांची साथ सोडा

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपले सर्वच क्षेत्रांतील वजन कमी झाले होते, अशी कबुली देत अप्रत्यक्षपणे पश्चात्ताप व्यक्त केला. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुला उशिरा का होईना शहाणपण आलं, ते तरी बरं झालं,” असा खोचक टोला जरांगे यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.