राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते स्वतःहून मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सततचे दौरे, बैठका आणि कामाच्या प
.
गेल्या काही काळापासून रोहित पवार हे राज्यभर विविध प्रश्नांवर सातत्याने दौरे करत आहेत. या धावपळीमुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि इतर शारीरिक त्रास जाणवत होता. असे असले तरी, आज रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या काही महत्त्वाच्या बैठका पार पाडल्या आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. मात्र, कामकाज आटोपल्यानंतर प्रकृती अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी स्वतःहून थेट रुग्णालयात जाण्याचा आणि वैद्यकीय तपासण्या करून घेण्याचा निर्णय घेतला.
चिंतेचे कोणतेही कारण नाही!
रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कोणतेही मोठे कारण नाही. केवळ धावपळीचा थकवा आणि तापाची लक्षणे असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले आहेत. वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर ते लवकरच पुन्हा पूर्ण ताकदीने जनसेवेत सक्रिय होतील,” अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अलीकडे विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका
रोहित पवार हे अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अत्यंत सक्रिय आणि आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या याच सततच्या संघर्षाचा ताण त्यांच्या प्रकृतीवर जाणवत असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील पेपरफुटी प्रकरण, वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचे प्रश्न यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारला वारंवार धारेवर धरले आहे. नुकतेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या या उग्र आंदोलनानंतर सरकारला नमते घेत कर्जमाफीच्या अटी शिथिल करणे भाग पडले होते.
हे ही वाचा…
मुंबईतील एसआरए कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची भेट:SRA कारभारावर रोहित पवारांचे ताशेरे, प्रलंबित प्रकल्पांवरून प्रशासनाला धरले धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने योगायोगाने भेट झाली. याप्रसंगी रोहित पवार यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि रहिवाशांना न मिळालेले घरभाडे या गंभीर समस्या त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच याप्रकरणी एसआरए कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. सविस्तर वाचा…