Headlines

Prashant Kishor Defeats BJP in Bankipur; Rohit Pawar Slams BJP


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक बांकीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे

.

रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांनी केलेले आंदोलन आणि बांकीपूरमधील पराभव यामुळे संसदेत डिलिमिटेशन बिल मंजूर होणार नाही. हा लोकशाहीचा विजय आहे. तर’अपना टाईम आ गया’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे.

रोहित पवारांची पोस्ट काय?

रोहित पवार म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..! आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल! असे रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटले आहे.

हे ही वाचा…

मुंबईतील एसआरए कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची भेट:SRA कारभारावर रोहित पवारांचे ताशेरे, प्रलंबित प्रकल्पांवरून प्रशासनाला धरले धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने योगायोगाने भेट झाली. याप्रसंगी रोहित पवार यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि रहिवाशांना न मिळालेले घरभाडे या गंभीर समस्या त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच याप्रकरणी एसआरए कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.