Headlines

मतदार भाजपला पराभूत करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी:हा निकाल लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक, बांकीपूर पोटनिवडणुकीवरून पृथ्वीराज चव्हाणांचे भाष्य




देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी तब्बल 18 हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या या पारंपरिक मतदारसंघात झालेला पराभव पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा तडा देणारा मानला जात आहे. या धक्कादायक निकालावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक आहे. ज्या मतदारसंघात भाजप आजवर कधीही पराभूत झाला नव्हता, तिथे प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला आहे. याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. देशात आता भाजपविरोधी लाट तयार होत असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत. भाजपला कोणता उमेदवार पराभूत करू शकतो, हे पाहून मतदार आता त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. सीजेपीच्या आंदोलनाचा प्रभाव पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,दिल्लीतील जंतरमंतरवर झालेले ‘कॉकरोच आंदोलन’ आणि राम मंदिर चोरी प्रकरणाचा या निवडणुकीवर थेट परिणाम झाला. राम मंदिरात नरेंद्र मोदींनी नेमलेले ट्रस्टी तिथे होते; मग या प्रकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार नाहीत का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला आहे. विरोधकांनी एकजूट कायम ठेवावी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जंतरमंतरवर झालेल्या युवकांच्या आंदोलनाचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. हे आंदोलन पूर्णपणे युवकांचे होते. काँग्रेस पक्ष 20 तारखेनंतर यात उतरला, कारण आम्हाला या आंदोलनात राजकारण आणायचे नव्हते. विरोधी पक्षांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. 10 टक्के मतदार वाढवायला सांगितले देशभरात सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,नेक ठिकाणी एकाच मतदाराची नावे दुबार-तिबार आली आहेत. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात 56 हजार दुबार नावे आढळली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही असाच प्रकार घडला आहे. 10 टक्के मतदार वाढवा, असे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *