Headlines

बीएएमएस, बीयूएमएस डॉक्टरांना ‘बोगस’ म्हणणाऱ्यांवर कारवाई:बदनामीचा सामना करणाऱ्या लाखो आयुष डॉक्टरांना मिळाला मोठा कायदेशीर दिलासा




आयुष आणि भारतीय वैद्यकीय पद्धतीच्या अधिकृत डॉक्टरांची प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरून होणारी बदनामी रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन’ने (एनसीआयएसएम) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. बीएएमएस, बीयूएमएस यासारख्या शासनमान्य पदव्या धारण करणाऱ्या नोंदणीकृत डॉक्टरांना “बोगस’ किंवा “क्वाक’ संबोधणे आता पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे. परंतु, या परिपत्रकाचा अर्थ “बनावट’ पदवी दाखवून प्रॅक्टिस करणाऱ्यांना “अभय’ असा अजिबात नाही.असा प्रकार करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा मीडिया हाऊसवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे. याबाबत नुकताच असा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर हा पूर्णपणे कायदेशीर आयोगाच्या “बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशन’चे अध्यक्ष डॉ. सुश्रुत कनौजिया यांच्या स्वाक्षरीने जारी परिपत्रकात स्पष्ट नमूद आहे की, भारतीय वैद्यक पद्धती मध्यवर्ती परिषद कायदा १९७० आणि एनसीआयएसएम कायदा २०२० च्या कलम ३४ आणि ५५ नुसार राज्य वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणी झालेला प्रत्येक डॉक्टर हा पूर्णपणे “कायदेशीर आणि मान्यताप्राप्त’ वैद्यकीय व्यावसायिक आहे. गंभीर प्रकाराची घेतली दखल अलीकडच्या काळात यूट्यूब, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरून भारतीय वैद्यक पद्धतीच्या डॉक्टरांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी छापील जाहीर नोटिसा किंवा माध्यमांतील बातम्यांमधूनही या डॉक्टरांचा उल्लेख “बोगस’ असा केला जात होता. यावर राज्यभरातील डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर प्रकाराची दखल आता घेण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन मानले जाणार “कोणत्याही प्राधिकरणाला किंवा माध्यमांना नोंदणीकृत डॉक्टरांच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्याचा अधिकार नाही. असा कोणताही प्रयत्न एनसीआयएसएम कायद्याचे थेट उल्लंघन मानला जाईल’, असा स्पष्ट इशारा आयोगाने दिला आहे. केंद्र सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे वर्षानुवर्षे सोशल मीडियावरील ट्रेलिंग आणि बदनामीचा सामना करणाऱ्या लाखो आयुष डॉक्टरांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. एक्स्पर्ट व्ह्यू डॉ. रवींद्र बोथरा, अध्यक्ष, निवडणूक व्यवस्थापन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी एनसीआयएसएमचा हा निर्णय भारतीय वैद्यक पद्धतीतील डॉक्टरांच्या स्वाभिमानाचे रक्षण करणारा आहे. बीएएमएस किंवा बीयूएमएस डॉक्टर हे साडेपाच वर्षांचे कठोर शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण करून शासनाच्या नियमानुसारच वैद्यकीय सेवा देतात. परंतु, केवळ ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद अशा वादातून किंवा अर्धवट माहितीच्या आधारे सोशल मीडियावर डॉक्टरांची “बोगस’ म्हणून बदनामी केली जात होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *