Headlines

Dissatisfaction after cabinet expansion in Karnataka; One MLA resigns, many leaders offer resignation


  • Marathi News
  • National
  • Dissatisfaction After Cabinet Expansion In Karnataka; One MLA Resigns, Many Leaders Offer Resignation

बेंगळुरू1 मिनिटापूर्वी

  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोमवारी १९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यासोबतच पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर आला. मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा व्ही. पाटील यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अनेक इच्छुकांनीही तसा प्रस्ताव दिला आहे.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी लोकभवनात मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विस्तारानंतर शिवकुमार मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या ३३ झाली आहे. मंत्रिमंडळात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र कुमार बंगारप्पा आणि माजी मुख्यमंत्री एन. धरम सिंह यांचे पुत्र अजय सिंह यांचा समावेश आहे.

ज्येष्ठ नेत्यांना स्थान नाही, अनेक ठिकाणी समर्थकांची घोषणाबाजी

सिद्धरामय्या सरकारमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना यंदा स्थान दिले नाही. एच. सी. महादेवप्पा, एच. के. पाटील, दिनेश गुंडूराव, के. व्यंकटेश, एम. सी. सुधाकर व लक्ष्मी हेब्बाळकर हे नेते मंत्रिमंडळात नाहीत. अनेक समर्थकांनी घोषणाबाजी केली.

सिद्धरामय्या यांची गैरहजेरी चर्चेत, महिला मंत्री नसल्याने प्रश्नचिन्ह

शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद उपस्थित होते, मात्र माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नसल्यानेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हायकमांडच्या यादीत विधान परिषद सदस्य (एमएलसी) गायत्री शांतीगौडा यांचे नाव होते, मात्र त्यांना अंतिम क्षणी शपथ देण्यात आली नाही. भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले के. एम. शिवलिंगे गौडा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

शिवकुमार यांचे संयम ठेवण्याचे आवाहन

सीएम डी. के. शिवकुमार यांनी नाराज नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पक्षात अनेक आमदार पात्र आहेत, परंतु प्रत्येक वेळी सर्वांनाच संधी शक्य नसते, असे ते म्हणाले. सुरुवातीच्या काळात स्वतःही वाट पाहिल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *