![]()
नांदेडजवळील असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात सोमवारी दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रावर चाकूने ९ वार केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. हा विद्यार्थी गंभीर जखम
.
शनिवारी दिनेश (बदललेले नाव) आणि त्याच्या दोन वर्गमित्रांमध्ये क्रिकेटवरून भांडण झाले होते. त्यात दिनेश व त्याच्या मित्रांनी त्या दोघांना मारहाण केली होती. याची माहिती पालकांना किंवा शाळेत दिली गेली नाही. याच रागातून रविवारी त्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी चाकू विकत घेतला. सोमवारी मध्यंतरात त्यांनी दिनेशला शाळेजवळील गणपती मंदिराजवळ नेऊन त्याच्या गळ्यावर, पोटात आणि हातांवर ९ वार केले. मुख्याध्यापक कोकरे यांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले व चाकू जप्त केला.
मुलगा गंभीर जखमी होता
मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेतून चाकूहल्ल्याची माहिती मिळताच मी धावतच शासकीय रुग्णालय गाठले. तिथे माझा मुलगा गंभीर जखमी असल्याचे पाहिले, असे दिनेशच्या आईने सांगितले. दिनेशचे वडील पुण्यात नोकरी करतात.
एक्स्पर्ट व्ह्यू मालिका हिंसाचाराचा परिणाम
चित्रपट व मालिकांमधील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर थेट परिणाम होत आहे. दरारा निर्माण करण्याची चढाओढ व वाढती व्यसनाधीनता यामुळे गुन्हेगारी वाढतेय. पालकांनी मुलांवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. रवींद्र नरोड, मानसोपचारतज्ज्ञ
दप्तरातून आणला चाकू दिनेशवरील हल्ला पूर्वनियोजित होता. दोन्ही विधिसंघर्षग्रस्त मुलांनी रविवारीच शहरातून चाकू खरेदी केला होता. सोमवारी शाळेत येताना त्यांनी तो दप्तरात लपवून आणला. संधी मिळताच चाकू खिशात ठेवला आणि पुन्हा वाद उकरून काढून दिनेशवर वार केले.