Headlines

धुळे तालुक्यात म्हशीला तलावातून बाहेर काढताना शेतकरी-गुराखी बुडाला:म्हैस वाचली, निमडाळे तलावावरील घटनेत दोघांचा मृत्यू




तलावातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर बुडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला गुराखी अशा दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती बालंबाल बचावला. या घटनेत म्हैस स्वत:हून पाण्यातून बाहेर आली. घटना रविवारी संध्याकाळी धुळे शहराजवळील निमडाळे शिवारात घडली. बापू पांडुरंग पाटील (६५) व दशरथ नाना मोरे (३८) अशी मृतांची नावे आहेत. जोरदार पावसामुळे धुळ्याजवळील निमडाळे शिवारातील तलाव पूर्ण भरला आहे. रविवारी बापू पाटील (६५) म्हशी घेऊन तलावावर गेले होते. यातील एका म्हशीला बाहेर काढण्यासाठी ते तलावात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी दशरथ मोरे यांनी पाण्यात उडी घेतली होती. तिसरी व्यक्ती वेळीच सावध म्हशीला तलावातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी बापू पाटील तलावात उतरले. मात्र ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना पाहून दशरथ मोरे व अन्य एकाने उडी घेतली. मात्र पाटील आणि मोरे दोघे पाण्यात दिसेनासे झाले. तर तिसऱ्या व्यक्तीने अधिक पुढे न जाता काठावर येऊन जीव वाचवला. विशेष म्हणजे पाटील व मोरे दोघांनाही पोहता येत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *