Headlines

जायकवाडी धरणात आवक कायम; उपयुक्त पाणीसाठा 88 टक्क्यांवर:22 हजार 390 क्युसेक वेगाने पाणी दाखल, मराठवाड्याला दिलासा‎




जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी वरच्या धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत पाण्याची आवक कायम आहे. सोमवारी धरणात २२ हजार ३९० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, सध्याच्या घडीला धरणाचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले असून आज मंगळवारी वरील आवक बघून मुख्य सांडव्याद्वारे विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी सांगितले. सोमवारी तहसीलदार ज्योती पवार यांनी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतली. यात नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी येणार नाही असे नियोजन पाणी सोडण्याच्या पूर्वी करण्याची मागणी करण्यात आली. आज धरणाची पाणीपातळी १५१९.७३ फूट असून धरणात ६७.३५ टीएमसी (१९०७.३७८ दलघमी) इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या सिंचनासाठी उजव्या कालव्यातून १,००० क्युसेक आणि डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर व नाशिक विभागातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. भंडारदरा धरणातून ५,२५९, निळवंडेतून ७,७५८, ओझर बंधाऱ्यातून ६,३०१, गंगापूरमधून ३,३८७, कडवामधून ३,८३२, भावलीतून १,२१८, पालखेडमधून ७,९६०, ओझरखेडमधून २,६३७, दारणा धरणातून ९,२८४, तर नांदूर-मधमेश्वरमधून २२,७७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर व नाशिकच्या विविध धरणांमधून विसर्ग सुरू ^या विसर्गाचा परिणाम पुढील काही तासांत धरणातील आवकेवर होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. आवक लक्षणीय वाढल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. -मंगेश शेलार, शाखा अभियंता



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *