Headlines

लासलगावसह 16 गावांचा पाणीपुरवठा आजपासून सुरळीत‎:20 दिवसांपासून पुरवठा हाेता खंडित; तीन दिवसांआड पाणी



नांदूरमध्यमेश्वरचे दरवाजे उघडल्याने पंपाजवळ पाेहाेचत नव्हते पाणी‎

दारणा, गोदावरी, बाणगंगा आणि वालदेवी नद्यांना आलेल्या पुरामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आल्याने जलपंपाजवळ आवश्यक पाणी उपलब्ध होत नव्हते. परिणामी लासलगाव शहरासह १६ गावांच्या समूह पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होऊन १५ ते २० दिवसांपास

.

अन्न व नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे सूचनेनुसार स्वीय सहाय्यक महेश पैठणकर व संबंधित पदाधिकाऱ्यांनी नांदूर-मधमेश्वर धरण परिसराची पाहणी केली. यावेळी १६ गाव पाणीपुरवठा समितीचे सचिव संजय बाविस्कर यांनी धरण व जलपंपावरील परिस्थितीची माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. पाहणीनंतर संबंधित विभागाला धरणाचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जलपंपाजवळ आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होताच लासलगावसह सर्व गावांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पूरस्थितीनंतर सुरुवातीला पाणी काही प्रमाणात गढूळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व शक्य असल्यास उकळून वापरावे, असे आवाहन १६ गाव पाणीपुरवठा समितीने केले आहे.

यावेळी योजनेच्या शेवटच्या टोकावरील आणि सर्वाधिक दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असलेल्या गावांना प्राधान्याने पाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायतींनी समन्वयाची भूमिका घेऊन पाणीवाटपात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *