![]()
आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच यश संपादन करता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सहकार्याची भावना आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग व
.
येथील श्री तिलोक जैन विद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. मोतीलालजी गुगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सतीश गुगळे होते. यावेळी खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त डॉ. ललित गुगळे, कांतीलाल गुगळे, संपतलाल गांधी, घेवरचंद भंडारी, चांदमल देसर्ड, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, विश्वजीत गुगळे, महेंद्र गुगळे, सोनू गुगळे, प्राचार्य अजय भंडारी, प्रा. विजय तागड, पर्यवेक्षक भारत गाडेकर उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ म्हणाले, पूर्वीचे शिक्षण वेगळ्या पद्धतीचे होते.आज पदोपदी प्रचंड स्पर्धा आहे. सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सहशालेय उपक्रम, वरिष्ठांशी बोलणे, चिकित्सक विचारपद्धती, सहकार्या ची भावना, क्रियाशीलता,आत्मविश् वास,इच्छाशक्ती सकारात्मक वृत्ती इ. बाबी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत
सतीश गुगळे म्हणाले,स्व. मोतीलालजी गुगळे यांनी शंभर वर्षांपूर्वी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.स्व.गुगळे यांनी आर्थिक निधी देऊन समाजाला शिक्षण संस्था उभारण्यासाठी दान करण्याची सवय लावली.त्यामुळे त्यांचे हे कार्य महान आहे.यावेळी विश्वस्त डॉ. ललीत गुगळे, उद्धव चन्ने यांनी मोतीलालजी गुगळे यांचे जीवनकार्य विषद केले. पर्यवेक्षक भारत गाडेकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी आपल्या यशामागे या संस्थेचा मोठा वाटा असल्याचे सांगत संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.प्रास्ताविक प्राचार्य अजय भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी, तर आभार विभागप्रमुख सुधाकर सातपुते यांनी मानले.
१०० विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव या कार्यक्रमात कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हनुमंतराव श्रीनिवास देशमुख व दुर्गाबाई हनुमंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ.भानुदास हनुमंतराव देशमुख यांच्या वतीने इयत्ता बारावीतील प्रथम विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले तसेच परशुराम मेहेंदळे व निर्मलाबाई मेहेंदळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्कृत व इंग्रजी विषयातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मेहेंदळे परिवारातर्फे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.