Headlines

नर्सेस फेडरेशनचे राज्यभरात 2 तास 'काम बंद' आंदोलन:मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा




महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) राज्यभरात दोन तासांचे ‘काम बंद’ आंदोलन केले. सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत परिचारिकांनी सेवा थांबवून जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील शासकीय परिचारिका संघटनेच्या सदस्यांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्यभरातील परिचारिकांच्या रिक्त पदांची भरती करण्याची मागणी सातत्याने केली जात होती, मात्र राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी हे आंदोलन केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी इशारा दिला आहे की, जर सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर बेमुदत संपावर जावे लागेल. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिचारिका संवर्गात तीव्र असंतोष आहे. परिचारिका, परिसेविका, विभागीय परिसेविका, पाठ्यनिर्देशिका, सहाय्यक आधिसेविका आणि आधिसेविका अशा विविध पदांवर हजारो जागा रिक्त आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही पदे भरणे अत्यंत आवश्यक असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला. ‘हे आंदोलन आम्ही स्वतःहून करत नसून, शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते आमच्यावर लादले गेले आहे,’ असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करणे, नवीन आकृतीबंध तयार करून त्यास त्वरित शासन मान्यता देणे, रखडलेली सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे आणि सर्व रिक्त पदांवर सरळ सेवेद्वारे तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करणे यांचा समावेश आहे. या निदर्शनांमध्ये फेडरेशनच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांच्यासह शुभमंगल भक्त, मकरंद उदयकार, प्रवीण व्यवहारे, वंदना कोळनूरकर, प्रतिभा अंधारे, कालिंदी इधाटे, लता सोंडगे, अनुजा टेकाळे, मुजम्मिल पठाण, गणेश गावडे, दादासाहेब कासार, मिलिंद तोगारवाड यांच्यासह हजारो परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात म्हणाल्या, ‘शासनाने आमच्या या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा, यानंतर राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात येईल.’ हेही वाचा.. ED, CBI सगळे तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही भाष्य सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *