![]()
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना तडीपारी अन गुन्हेगारांचा सत्कार करणे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रवीकांत तुपकर यांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांना मंगळवारी ता. ४ दिला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नामदेव कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना तुपकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना प्रशासनाने तडीपारीची नोटीस बजावली. मात्र आंदोलनाची ताकद काय असते हे आम्ही यापूर्वीच दाखवून दिले आहे. आम्ही अनेक साखर कारखानदार आणि दूध संघ चालवणाऱ्या प्रस्थापितांचा माज उतरवला आहे आणि त्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. जर हिंगोलीच्या सत्ताधाऱ्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, तर तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही आणि गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अन्यायाविरुद्ध लढताना प्रसंगी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही हिंगोली जिल्हयातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत ते म्हणाले की, अधिकारी जिल्ह्यात बदलून येतात आणि जातात, पण जर आम्ही तुमच्या भ्रष्टाचाराची तक्रार करायचे ठरवले आणि तुमच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त असलेल्या संपत्तीची चौकशी लावली, तर तुम्हालाही शांतपणे झोपता येणार नाही. आम्ही शेतकरीपुत्र असून अन्यायाविरुद्ध लढताना प्रसंगी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जमवलेली संपत्ती कशी आहे, हे आम्हाला शोधता येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ..तोपर्यंत हिंगोलीचे मैदान सोडणार नाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने केलेली तडीपारीची कारवाई रद्द केली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो शेतकरीपुत्रांना हिंगोलीत गोळा केले जाईल. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि तडीपारी रद्द होत नाही, तोपर्यंत हिंगोलीचे मैदान सोडणार नाही आणि इथून हटणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल करण्याची पद्धत बंद करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते हिंगोलीत दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा.. ED, CBI सगळे तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?: शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही भाष्य सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा
Source link
रविकांत तुपकर यांचा इशारा:म्हणाले- तडीपारीची कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील