Headlines

बोहरेचा प्रलंबित भूसंपादनाचा विषय मार्गी:आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत दिले निर्देश‎




गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बोहरे (ता. अमळनेर) येथील पाडळसरे धरणांतर्गत भू-संपादन आणि संपूर्ण पुनर्वसनाचा विषय आता मार्गी लागणार आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तातडीची बैठक लावली. या बैठकीत बोहरे येथील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी बोहरे येथील रखडलेल्या भू-संपादन प्रक्रियेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बोहरे येथील प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून, पुढील तापी महामंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचे व त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, तापी पाटबंधारे विभागाचे महाजन, य. म. कडलग यांसह सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांच्या वतीने अनिल अहिरराव, यशवंत पाटील, दीपक पाटील, सुभाष बागुल, हेमंतराव विंचूरकर, कैलास विंचूरकर, रतन धनगर, अशोक कोळी, दिलीप कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *