![]()
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवत पतीने भररस्त्यात पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पतीचा पोलिस शोध घेत आहेत. ‘आज माझा तरी शेवट नाहीतर…पुढच्याचा’ असे स्टेटस हत्येपूर्वी पतीने आपल्या मोबाईलवर ठेवला होते. बुधवारी संध्याकाळी पेठवडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील परिसरात भर पावसात हा थरार घडला. अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर “विषय संपवला” असे ओरडत आणि स्वतःच्या मिशीवर ताव मारत आरोपी पती दीपक कांबळे (वय ३५) घटनास्थळावरून पसार झाला. ८ वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी दीपक कांबळे आणि अमृता यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. सुरुवातीला सर्व काही नीट सुरू असताना गेल्या काही महिन्यांपासून दीपक हा पत्नी अमृता हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊ लागला होता. याच कारणावरून दोघांमध्ये दररोज कडाक्याची भांडणे होत होती आणि संसारामध्ये मोठे खटके उडत होते. वकिलाला भेटायला गेली अन् काळ बनून आला नवरा बुधवारी संध्याकाळी पेठवडगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. अमृता कांबळे या एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये कायदेशीर सल्ल्यासाठी एका वकिलाची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. पत्नी तिथे आल्याची कुणकुण लागताच दीपक कांबळे हातात धारदार कोयता घेऊन त्या ठिकाणी टपून बसला होता. कॉम्प्लेक्स परिसरात दोघांची गाठ पडली आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दीपकने त्याच्या जवळील कोयता काढला आणि भररस्त्यात अमृता यांच्यावर एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. बघ्यांसमोरच थरार; “ती माझी पत्नी आहे, मध्ये पडू नका” हा भयानक प्रकार सुरू असताना एसटी स्टँड परिसरात मोठी गर्दी जमली होती. भर पावसात अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि मदतीसाठी ओरडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी काही धाडसी तरुण पुढे सरसावले. मात्र, नरपिसा बनलेल्या दीपकने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत तरुणांना धमकावले. “ती माझी पत्नी आहे, हे आमचं अंतर्गत मॅटर आहे, तुम्ही कोणीही यामध्ये पडू नका,” असे ओरडत त्याने अमृता यांच्यावर आणखी वार केले. वर्दळीच्या ठिकाणी शेकडो लोकांदेखत अमृता यांनी जागीच प्राण सोडले. हत्या केल्यानंतर आरोपी दीपकने ‘विषय संपवला’ असे गर्जना करत मिशीवर ताव मारला आणि तो तिथून पळून गेला. पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध सुरू या हत्येची माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. फरार झालेला पती दीपक कांबळे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. हेही वाचा.. अमरावतीमध्ये प्रियकराचा अत्याचार; वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या:प्रियकरासह त्याचा मित्र अन् मृत तरुणीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, तिच्या अल्पवयीन प्रियकराने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला, तसेच तिला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास दिला. यासंपूर्ण प्रकारामुळे आपल्या वडिलांची समाजात इज्जत जाऊ नये, या भीतीने खचलेल्या या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मुख्य अल्पवयीन प्रियकरासह, त्याला साथदेणारा त्याचा मित्र आणि मृत मुलीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी 7 जुलैला गुन्हा नोंद केला आहे. सविस्तर वाचा..
Source link
कोल्हापुरात भररस्त्यात पत्नीचा खून:मध्ये पडू नका, ती माझी बायको आहे; 'विषय संपवला' म्हणत पती घटनास्थळावरुन फरार