![]()
भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचा डायरेक्टर शरद पवारांना करावे, असा खोचक सल्ला दानवे यांनी दिला आहे. तसेच यांची लोकप्रियता सोडा, यांच्यासोबत राहणे आणि फिरणे म्हणजे लोक अपमान समजायला लागले आहेत, अशी टीकाही दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. संसदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, लोकसभेचे अधिवेशन हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या समस्या मांड्यासाठी त्याचबरोबर देशाचा कारभार पाहण्यासाठी असतो. देशामध्ये पेपरफुटी प्रकरण नको व्हायला हवे होते. जो प्रकार झाला तो वाईट झाला आहे. पण यापूर्वी देखील पेपरफुटीचे प्रकार झालेले आहेत. पण विरोधकांनी सात दिवसांत एकदाही चर्चेत भाग न घेता केवळ गोंधळ घातल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. तसेच विरोधकांना पेपरशी कोणताही घेणे देणे नाही. प्रसंग पडला तर प्रधानमंत्री सभागृहात येत असतात परंतु पूर्णवेळ कोणताही प्रधानमंत्री पूर्ण संपेपर्यंत सभागृहात बसून राहत नाही, असेही दानवे यांनी म्हटले. एक दिवसांचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा संजय राऊत यांनी ‘लापता गृहमंत्री’ अशी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, संजय राऊत यांनी लापता गृहमंत्री चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेला एक दिवसांचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचे डायरेक्टर शरद पवार यांना करावे. संजय राऊत यांना चॅनेल आणि वर्तमानपत्रांमध्ये यायचं असेल तर अशा प्रकारच्या बातम्या ते देत असतात. खरे गुंड यांच्याच पक्षात आहेत. त्यांच्यासोबत फिरणे देखील लोक अपमान समजायला लागले महाराष्ट्राच्या जनतेने मातीचे राजकारण करत नको असलेल्यांना मातीतच मिळवल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी किंवा जास्त होणे हे काही संजय राऊत यांच्या हातात नाही, असे स्पष्ट करत दानवे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात कोणाची लोकप्रियता कमी झाली हे त्यांच्या आमदारांच्या संख्याबळावरूनच स्पष्ट होते. त्यामुळे यांची लोकप्रियता तर सोडाच, पण आता यांच्यासोबत राहणे आणि फिरणे हादेखील लोक स्वतःचा अपमान समजू लागल्याचा सणसणीत टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. कॉंग्रेस कधीच कोणाला चांगले म्हणत नाही कॉंग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, अशा प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षांना किंवा नेत्यांवर करणे योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नवीन आहेत. अजितदादा गेल्यानंतर पोकळी भरून काढण्याचे काम पक्षाने त्यांच्याकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन असे करता येणार नाही. सुनेत्रा पवार यांचे अशा प्रकारचे वर्णन करणे ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगले म्हणत नाहीत, असे दानवे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा बांकीपूरमधील पराभव म्हणजे मोदी-भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचे उदाहरण:संजय राऊतांसह पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवारांचा निशाणा बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तब्बल 30 वर्षांचा गड ढासळल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. हा पराभव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचा पुरावा असून, मतदारांना गृहीत धरल्याची ही शिक्षा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर
Source link
संजय राऊतांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री चित्रपट काढावा:रावसाहेब दानवेंचा खोचक सल्ला, म्हणाले- डायरेक्टर शरद पवारांना करावे