![]()
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा अंतर्गत ‘लिपीक’ वर्गीय कर्मचाऱ्यांची सेवाप्रवेश परीक्षा नुकतीच पार पडली होती. या परीक्षेचा निकाल अवघ्या सात दिवसांत जाहीर करण्यात आला. कर्मचाऱ्यांप्रती दर्शविलेल्या या तत्परतेबद्दल कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचा सत्कार केला. विभागीय आयुक्तांच्या तत्परतेमुळे उत्तरपत्रिकांची तपासणी, हरकतींचे परीक्षण आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया केवळ सात दिवसांत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ३१ जुलै रोजी अमरावती विभागाने महाराष्ट्रात सर्वप्रथम अंतिम निकाल जाहीर केला. अल्पावधीत, अत्यंत पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने निकाल जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे. ही गतिमान प्रक्रिया राज्यातील इतर विभागांसाठीही एक आदर्श ठरली, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी व्यक्त केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे तसेच अपर आयुक्त संतोष कवडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्यासह सचिव संजय राठी, कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम, पदाधिकारी गजानन कोरडे, विजय कविटकर, लिलाधर नांदे, सतीश पवार, जीवन नारे आणि तुषार वडतकर आदी उपस्थित होते.
Source link
अमरावती जि.प. लिपीक परीक्षेचा निकाल 7 दिवसांत जाहीर:कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्तांचा सत्कार केला