![]()
सदाभाऊ खोत पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्यापलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारू नका, असे म्हणत पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, या आमदार सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबावर टीका करत आहात, त्याच कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही आणि तुमचे सवंगडी सध्या ज्यांचा प्रचार करत आहात, त्या सुनेत्रा वहिनी त्याच घराण्यातील आहेत. माणसाने बोलताना आपल्याला झेपेल तितकंच बोलावं.
पवार कुटुंबांचे मोठे योगदान रोहिणी खडसे म्हणाल्या की, शरद पवारांचे वडील सत्यशोधक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात मोलाची साथ दिली. पवारांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या.जिथे समाज वंशाच्या दिव्यासाठी मुलाचा अट्टाहास धरतो, तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करून कृतीतून पुरोगामी विचार जपले आहेत. पवारांच्या निर्णयामुळे महिलांना मिळाले बळ रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांत 33% आरक्षण देऊन देशात महिला आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती, याचा मला सार्थ अभिमान आहे.महिलांना केवळ राजकारणातच नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी महाराष्ट्रात क्रांतिकारी पाऊल उचलले होते. त्यांच्या या निर्णयामुळेच आज हजारो महिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी गाजवत आहेत. काय म्हणाले होते सदाभाऊ खोत? बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबावर सत्तागामी असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, पवार कुटुंब कधीच पुरोगामी नव्हते. पुरोगामीत्वाच्या आडोशाने केवळ सत्ता मिळवणे हाच त्यांचा महाराष्ट्रातील एककलमी कार्यक्रम राहिला आहे. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसायचे, हेच त्यांचे राजकारण आहे. यावेळी त्यांनी पुरोगामी विचारवंतांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Source link
पुरोगामी विचार तुमच्या झेपण्यापलिकडचे, त्यामुळे फार बाता मारून नका!:सुनेत्रा वहिनीही त्याच कुटुंबाच्या, रोहिणी खडसेंनी सदाभाऊ खोतांना सुनावले