![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली असली, तरी जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ई-केवायसीच्या टप्प्यातच अडकली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारी
.
४ ऑगस्टपासून कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यांत जमा होईल, अपेक्षेने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी दिवसभर बँका, सेवा केंद्रे आणि संबंधित कार्यालयांकडे चौकशीसाठी धाव घेतली. मोबाईलवर बँकेचा संदेश येतो का, याकडेही लक्ष लागले होते. मात्र, दिवसअखेर बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने संभ्रम आणि निराशा वाढली. १ लाख ९० हजार पात्र लाभार्थींपैकी ८५ हजार शेतकरी अजूनही दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक Q. यादीतील किती शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे? A. १,०५,०२८ लाभार्थींपैकी ६५,१०० शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे. Q. शेतकऱ्यांनी काय करावे? A. ३९,९२८ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावे. त्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होईल. Q. कर्जमुक्तीची रक्कम जमा झाल्याचे कसे समजेल? A. रक्कम खात्यात जमा होताच बँक आणि लाभार्थी शेतकरी दोघांनाही एसएमएस जाईल. Q. दुसऱ्या यादीची स्थिती? A. सुमारे ८५ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादीही लवकरच प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्यांनाही प्रमाणीकरण करावे लागणार आहे. पहिल्या यादीतील १,०५,०२८ लाभार्थींपैकी ६५,१०० शेतकऱ्यांचेच ई-केवायसी पूर्ण झाले आहे. ३९,९२८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहे. संथ सर्व्हर, आयडी पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत.