![]()
वाशिंबे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, मुळा-मुठा नदीतून वाहत आलेल्या जलपर्णीने आता उजनी जलाशयाच्या काठाला विळखा घातला आहे. पाणीपातळी स्थिर असल्याने वाऱ्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात नदीकाठी
.
उजनी जलव्यवस्थापनाने दूषित पाण्याबाबत व जलपर्णी निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडून मार्गदर्शन मागवले आहे. गेल्या काही वर्षांत उजनी जलाशयातील प्रदूषण वाढल्याने पाण्याचा रंग हिरवट झाला आहे. सिंचनासाठी आणि मासेमारीसाठी पाण्यात उतरणाऱ्या शेतकरी व मच्छीमारांना त्वचेवर खाज येण्याच्या तक्रारी होत आहेत. विशेष म्हणजे, उजनी जलाशयातून सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एकेकाळी उजनीचे ओंजळीने पाणी पित होते.
एकेकाळी उजनी जलाशयातील पाणी इतके स्वच्छ होते की शेतकरी ओंजळीने पाणी पित होते. मात्र, मागील पाच-सहा वर्षांत पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. आज परिस्थिती अशी आहे की पाण्यात हात घालण्याचीही इच्छा होत नाही. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीमार्गे मोठ्या प्रमाणात आलेल्या जलपर्णीने जलाशयाचा नदीकाठ व्यापला असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी हटवण्यासह पाणी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. -गणेश झोळ, संचालक, मकाई
कारखाना मंडळाला पत्र पाठवलेय
उजनी जलाशयातील पाणी प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र पाठविण्यात आले आहे. जलाशयातील पाण्याचे नमुने तपासून प्रदूषणाची कारणे, तीव्रता आणि त्यावरील उपाययोजना निश्चित करण्यासाठी मंडळाचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येवर प्रभावी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील, याबाबतही मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. – सुचेता डूंबरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन