![]()
पद्मशाली समाजातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पद्मशाली महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या पदग्रहण व नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शासकीय योजनांचा लाभ, कौशल्य विक
.
संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती शिरसुल यांनी समाजातील अनेक महिला पूर्वी विडी उद्योगावर अवलंबून होत्या; मात्र हा व्यवसाय बंद पडल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा महिलांना शासनाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्य करेल, असे सांगितले.
तेलुगू भाषा व संस्कृतीचे जतन, महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविणे आणि घरकुलासाठी पाठपुरावा करणे, अशी संस्थेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा शामला बोरा यांनी महिलांनी संघटित होण्याचे आवाहन केले. माजी नगरसेविका लक्ष्मीबाई गुंडू यांनी समाजातील विवाहविषयक समस्यांकडे लक्ष वेधले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा गीता गिल्डा यांनी महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोपात सखुबाई संदुपटला यांनी महिलांनी शिक्षण, उद्योग आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेत समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड संस्थेच्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. स्वाती शिरसुल यांची अध्यक्षा, ज्योती बिज्या व सारिका म्याना यांची उपाध्यक्षा, रेणुका गाली यांची सचिव आणि पदमा म्याना यांची खजिनदार म्हणून निवड झाली. याशिवाय १५ महिलांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सी.ए. सुनंदा रच्चा यांनी केले, तर रेणुका गाली यांनी आभार मानले. समाजातील मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून नव्या संस्थेला शुभेच्छा दिल्या.