नीट पेपरफुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. जंतर-मंतरवरील ऐतिहासिक यशानंतर आता या संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे सं
.
राजकीय पक्ष की दबावगट? सीजेपीने भूमिका केली स्पष्ट
जेन-झी (Gen-Z) तरुणांना त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरवणाऱ्या सीजेपीचे रूपांतर आता राजकीय पक्षात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. “देशात आधीच 700 ते 800 राजकीय पक्ष आहेत, तरीही सामान्य लोकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय पक्ष काढणे हा यावर उपाय नाही. समाजात जागृतीची आणि एका चळवळीची गरज आहे. त्यामुळे आम्ही पारंपरिक राजकारणाला फाटा देत भविष्यातही केवळ ‘दवाबगट’ म्हणूनच काम करू,” अशी स्पष्ट भूमिका सौरव दास यांनी मांडली आहे.
36 दिवसांचा लढा आणि मंत्र्यांचा राजीनामा
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीवर केलेल्या उपरोधिक पोस्टनंतर अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती. अमेरिकेतून भारतात परतलेल्या दिपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर सलग 36 दिवस मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. देशातील बलाढ्य विरोधी पक्ष जे करू शकले नाहीत, ते या तरुणांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावासमोर झुकून अखेर 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या ऐतिहासिक यशानंतर अभिजीत दिपके आपल्या मूळ गावी, छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले असून, उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
पुढील टार्गेट ‘E20 इंधन’? कोअर कमिटीची खलबते
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या 2 दिवसीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि ध्येयधोरणे ठरवली जाणार आहेत. या बैठकीला सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह कोअर कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. सीजेपीची चळवळ तळागळातील लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, यावर या बैठकीत मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच E20 इंधनाच्या मुद्द्यावरही कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
भाजपकडून ऑफर?
काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आपल्याला भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली होती, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपने त्यांचा हा दावा फेटाळून लावला होता. आता पहिल्याच आंदोलनात यश मिळवलेली कॉकरोच जनता पार्टी आगामी काळात व्यवस्थेला कसे धक्के देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा…
ED, CBI सगळे तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही भाष्य

सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी