Headlines

भंडाऱ्यातील ग्रामपंचायतीतच राडा:मोबाइलवर शूटिंग सुरू करताच महिला सरपंच भडकल्या, तरुणाला दिला चोप; व्हिडीओ व्हायरल




ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून एका तरुणाला चक्क महिला सरपंच आणि त्यांच्या पतीने ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द येथे ही घटना घडली असून, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, विरली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शारदा जितेंद्र पारधी या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती जितेंद्र मधुकर पारधी हे लाखांदूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत. गावातीलच एक रहिवासी पांडुरंग मधुकर ठाकरे यांनी गावात झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ अंतर्गत ३० जुलै २०२६ रोजी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. या अर्जावर काय कार्यवाही झाली, याची माहिती जाणून घेण्यासाठी अर्जदार पांडुरंग ठाकरे आणि त्यांच्यासोबत गावातीलच तुषार भागडकर हे ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी ग्रामसेवकाकडे विचारपूस करत असताना तिथे उपस्थित असलेल्या सरपंच शारदा पारधी आणि त्यांचे पती जितेंद्र पारधी यांच्यासोबत या तरुणांचा शाब्दिक वाद सुरू झाला. मोबाइलवर चित्रीकरण सुरू करताच भडकल्या सरपंच हा शाब्दिक वाद सुरू असताना तुषार भागडकर याने आपल्या मोबाइलवर या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मोबाइलचा कॅमेरा सुरू असल्याचे पाहताच महिला सरपंच शारदा पारधी आणि त्यांचे पती जितेंद्र पारधी यांचा राग अनावर झाला. त्यांनी थेट तुषारच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण केली. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या याच मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. अद्याप पोलिसांत नोंद नाही, मात्र तालुक्यात चर्चेला उधाण लोकशाहीत माहिती अधिकाराचा वापर करून विकासकामांची माहिती मागणाऱ्या नागरिकांना जर अशा प्रकारे मारहाण होत असेल, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुठे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा.. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुढील टार्गेट कोणते?: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कोअर कमिटीची बैठक; संघटना वाढवून तळागाळात नेण्यावर होणार खल नीट पेपरफुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. जंतर-मंतरवरील ऐतिहासिक यशानंतर आता या संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी 2 दिवसीय अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *