![]()
टेलिग्रामवरून बालकांच्या लैंगिक शोषणाची सामग्री व अश्लील व्हिडिओ विकणाऱ्या बीकॉम द्वितीय वर्षातील २ विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. या विद्यार्थ्यांनी अटकेपूर्वी कारवाईच्या भीतीने क्लाउड स्टोरेजवरील ३,०४१ व्हिडिओ डिलीट केले. पार्थ सुनील कुलकर्णी (२१, रा. सुभाषचंद्र बोसनगर, टीव्ही सेंटर, हडको) व शुभम राजेंद्र लोहाडे (२०, पाथ्ररीकर नगर, हडको) अशी या तरुणांची नावे आहेत. ते टेलिग्रामवर चॅटिंग, डेटिंग व पॉर्न ग्रुप्सद्वारे विक्री करत होते. बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ १०० ते ५०० तर काही छायाचित्रे ५ रुपयांना विकत होते. पार्थ टेलिग्राम खाती चालवून सामग्री ग्राहकांना पाठवत होता तर शुभम विक्रीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारत होता. पार्थ लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याला नातेवाईक शिकवताय. दिल्ली, गुजरात, पंजाबसह आंतरराज्य रॅकेटचा मुख्य सप्लायर परराज्यात शुभमच्या बँक खात्यावरील ‘यूपीआय’ व्यवहारांनुसार गुजरात, पंजाब, दिल्लीसह राज्यातील विविध भागांतील ग्राहकांनी २०२३ पासून ५ ते ५०० रुपयांचे पेमेंट केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात पुणे, मुंबईतील काही तरुणांचाही समावेश आहे. या खात्यावर महिन्याला ६० ते ७० व्यवहारांतून २० ते २५ हजार रुपये मिळत होते. पार्थ हा शुभमव्यतिरिक्त दुसऱ्या एका साथीदाराच्या खात्यावरही पैसे स्वीकारत होता. सर्वात गंभीर बाब म्हणजे पार्थ आणि शुभम हे केवळ वितरक आहेत. आंतरराज्य रॅकेटचा मुख्य सप्लायर परराज्यात त्यांना तब्बल ३,०४१ व्हिडिओंचा ‘क्लाउड डेटा’ पुरवणारा मुख्य ‘सप्लायर’ परराज्यातील एका मोठ्या डार्कनेट सिंडिकेटशी जोडलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. ३ वर्षांतील या हजारो डिजिटल व्यवहारांची पाळेमुळे शोधल्यास एक मोठे आंतरराज्य रॅकेट उघडकीस येऊ शकते. डिलीट व्हिडिओ होणार रिकव्हर पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना १ ऑगस्टला या प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी आरोपींच्या पालकांना समज दिली. २, ३ ऑगस्टला पार्थ, शुभम हजर झाले. त्यांच्या मोबाईल व टॅबच्या तपासणीत त्यांनी क्लाउडवरील व्हिडिओ डिलीट केल्याचे आढळले. मात्र, तांत्रिक विश्लेषणात त्यांच्याकडे ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले असून, डिलीट डेटा फॉरेन्सिकमार्फत रिकव्हर केला जाईल. ४ दिवसांपूर्वीच पोलिसांनी अश्लील व्हिडिओंचा संग्रह करणारा फार्मसीचा विद्यार्थी अक्षयला (रा. भावसिंगपुरा) ४९० व्हिडिओंसह अटक केली होती. ही कारवाई निरीक्षक जाधव, हवालदार योगेश तळवंदे, अमोल सोनटक्के यांच्या पथकाने केली.
Source link
500 रुपयांत ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’च्या व्हिडिओची विक्री; 2 विद्यार्थ्यांना अटक:छत्रपती संभाजीनगरातील प्रकार, टेलिग्रामवरून सुरू होती विक्री