![]()
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी १४ टेबलची व्यवस्था केली आहे. पहिल्या पसंतीची मते दुपारपर्यंत कळतील. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील ८१ केंद्रांवर मतदान झाले. ३५ हजार ८१० मतदारांपैकी ९२.२५ टक्के मतदारांनी मतदान केले. ३३ हजार ३४ मतपत्रिका मोजण्यासाठी १७५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त आहेत. मतमोजणी लोकशाही भवनात सकाळी ८ वाजता सुरू होईल. मतपत्रिका एकत्र करून मिसळल्या जातील. २५-२५ च्या गठ्ठ्यांमध्ये विभागून अवैध मतपत्रिका वेगळ्या होतील. वैध मतपत्रिकांनुसार विजयाचा कोटा ठरेल. १४ टेबलवर हजार मतपत्रिका ठेवून पहिल्या पसंतीची मते मोजली जातील. ३३ हजार ३४ मतपत्रिका असल्याने पहिल्या पसंतीची मते कळायला तीन फेऱ्या लागतील. सायंकाळपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Source link
अमरावती शिक्षक आमदार निवडणुकीची मतमोजणी उद्या:14 टेबलवर होणार मतमोजणी, दुपारपर्यंत कळणार पहिल्या पसंतीचा कौल