![]()
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता लोकशाही भवनात सुरु होईल. यासाठी १४ टेबल आणि १७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पहिल्या पसंतीची मते कळायला दुपारचे ४ वाजणार, त्यामुळे अंतिम निकाल दुसऱ्या दिवशी लागेल. २३ ऑक्टोबरला पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर मतदान झाले होते. ३५ हजार ८१० मतदारांपैकी ३३ हजार ३४ (९२.२५ टक्के) मतदारांनी हक्क बजावला. मतमोजणीत मतपत्रिका एकत्र करून सरमिसळ केली जाईल. अवैध मतपत्रिका वेगळ्या काढून वैध मतपत्रिकांवरून विजयाचा ‘कोटा’ निश्चित होईल. ३३ हजार ३४ मतपत्रिका असल्याने, तीन फेऱ्या झाल्यावरच पहिल्या पसंतीची मते स्पष्ट होतील. जर एकाही उमेदवाराने ‘कोटा’ पूर्ण केला नाही, तर बाद फेरी सुरु होईल. यात कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या पसंतीची मते इतरांना दिली जातील. काल, सोमवारी मतमोजणीची रंगीत तालीम झाली.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरु:पहिल्या पसंतीची मते कळायला दुपारचे 4 वाजणार, अंतिम निकाल दुसऱ्या दिवशी