![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके धोक्यात आली, चारा-पाण्याच्या टंचाईमुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आपली जनावरे विकण्याची वेळ आली आहे. गुरांना चारा-पाणी कुठून आणायचे या चिंतेने पशुपालक त्रस्त आहेत. संगोपनाचा खर्च वाढल्याने आणि उत्पन्नात घट झाल्याने त्यांनी बाजारात जनावरे विकायला सुरुवात केली आहे. चारा-पाण्याच्या टंचाईमुळे तालुक्यात गायी, बैल आणि वासरांच्या संख्येत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा पशुपालकांनी केला आहे. लहान वासरांचे संगोपन खर्चिक ठरत असल्याने त्यांना सांभाळायचे की विकायचे, असा पेच पशुपालकांसमोर आहे. कमी किमतीत जनावरे विकावी लागत असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या, चारा डेपो आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निळकंठ ढोके यांनी केली आहे.
Source link
दुष्काळामुळे पशुपालक हतबल, जनावरे विकण्याची वेळ:चारा-पाण्याच्या टंचाईमुळे 30 टक्के पशुधन घटले, उपाययोजनांची मागणी