Headlines

Eknath Shinde Warns Ministers; Major Cabinet Reshuffle Likely in Maharashtra


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयात पार पडलेल्या शिवसेनेच्या स्वतंत्र बैठकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या चार मंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना थेट पदावरून हटवण्य

.

शिंदेंच्या रडारवर असलेले ‘ते’ मंत्री कोण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी झापलेल्या 4 पैकी 3 मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, वने व मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा समावेश असल्याचे समजते. या मंत्र्यांच्या खात्याचा कारभार समाधानकारक नसून, वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा झालेली नाही, अशी खंत शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केली.

बैठकीत नेमके काय घडले?

मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. “जनतेची कामे मार्गी लावा, आपल्या मतदारसंघात लक्ष द्या आणि पक्षसंघटनेची वाढ करा. अन्यथा मला खांदेपालट करावा लागेल,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मंत्र्यांना सुनावले. विदर्भ, वाशीम, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पक्ष वाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दर 3 महिन्यांनी कामगिरीचा आढावा

पक्षनेतृत्वाकडून दर 3 महिन्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा एक अहवाल तयार केला जातो. या अहवालात जर संबंधित मंत्र्यांच्या कामाचा आलेख उंचावलेला दिसला नाही, तर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नगरसेवकांनाही कानमंत्र: ‘तुम्ही नगराचे मालक नाही, सेवक आहात’

मंत्र्यांसोबतच एकनाथ शिंदे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (उत्तन, भाईंदर) येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांचेही कान टोचले. कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ-बदलापूर येथील नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “काही जण निवडून आल्यावर वॉर्डाचा सातबारा आपल्या नावावर झाला आहे, अशा थाटात वागतात. तसे वागल्यास पुढच्या निवडणुकीत जनता तुम्हाला घरी बसवते.” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘नगरपिता’ ऐवजी ‘नगरसेवक’ हे नाव का दिले, याची आठवण त्यांनी आवर्जून करून दिली.

शेवटच्या बाकावरून पहिल्या बाकावर आलो

सभागृहातील कामकाजाचे महत्त्व समजावून सांगताना शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचे उदाहरण दिले. “काही लोक सभागृहात केवळ हजेरी लावतात आणि दोन-चार विषय बोलून निघून जातात. पण सभागृहात शेवटपर्यंत थांबून इतरांचे ऐकणे महत्त्वाचे असते.” “मी एकेकाळी शेवटच्या बाकावर बसायचो, पण आता पहिल्या बाकावर आलो आहे. शाखाप्रमुखापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतची मजल केवळ प्रामाणिक जनसेवेमुळेच मारता येते,” असा मोलाचा सल्ला त्यांनी लोकप्रतिनिधींना दिला.

हेही वाचा…

धनुष्यबाणावर कोणाचा हक्क?: अडीच वर्षांपासूनच्या शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेनेतील फुटीनंतर सुरू झालेल्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेली अडीच ते तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.