Headlines

नियोजनबद्ध, परिणामकारक कामाद्वारे थकीत मालमत्ता कराची वसुली करावी:उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांचे निर्देश‎


.

‘महापालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकित वसुलीला वेग देण्यासाठी नियोजनबद्ध, परिणामकारक काम करणे अनिवार्य असून, यासाठी संपूर्ण समन्वयाने यंत्रणा कामाला लावावी,’ असे निर्देश मंगळवारी ४ ऑगस्टला महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.

मनपा आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीची सद्य:स्थिती, विभागनिहाय उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित थकबाकी, मोठ्या करदात्यांकडील वसुली, कर संकलनातील अडचणी, महसूल वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा केली. बैठकीत आयुक्तांनी मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असल्याचे सांगत, निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागाने दैनंदिन व साप्ताहिक वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करून त्याचा नियमित आढावा घ्यावा, प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित कर वसुलीकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत अधिकाऱ्यांनी विभागनिहाय कर वसुलीचा आढावा, प्रलंबित प्रकरणे, मागील वर्षाच्या तुलनेतील प्रगती, महसूल वाढीसाठी आखलेले नियोजन आणि येणाऱ्या अडचणी याबाबत सादरीकरण केले. विविध विभागांतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेत आयुक्तांनी अपेक्षित प्रगती न झालेल्या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. मालमत्ता कराच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, नव्याने बांधलेल्या मालमत्तांचा कर आकारणी प्रक्रियेत समावेश करणे, मालमत्तांची माहिती डिजिटल स्वरूपात अद्ययावत करणे आणि महसूल वाढीसाठी उपलब्ध सर्व पर्यायांचा प्रभावी वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.बैठकीच्या शेवटी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. महसूल वाढल्यास शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सेवांच्या विकासकामांना अधिक गती देता येईल, यासाठी मालमत्ता कर वसुली अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. या बैठकीत अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, मुख्‍यलेखाधिकारी शिल्‍पा पवार, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी वैशाली गाठे, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्‍हाण, प्रवीण ठाकरे, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, हरीश संतोसिया, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना देताना आयुक्तांनी संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे, नोटीस बजावणे, नियमित पाठपुरावा करणे आणि आवश्यकतेनुसार महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. ज्या प्रकरणांमध्ये दीर्घकाळापासून थकबाकी आहे, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून प्राधान्याने वसुली करावी, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *