![]()
अकोला शहराचे श्रद्धास्थान असलेल्या राजेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा गेल्या तीन वर्षांपासून तसाच असल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. १७ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असून या खड्ड्यामुळे कावड कावडधारक भक्तांची गैरसोय होणार आहे. तसेच मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या हजारो भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. राजेश्वर मंदिर हे अकोलेकरांचे प्रमुख श्रद्धास्थान असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिरासमोरील खड्डा, अस्वच्छ परिसर आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंदिरासमोरील खड्डा तातडीने बुजवून परिसराची स्वच्छता करावी, नाल्यांची साफसफाई करावी तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. नियमित साफसफाई होत नसल्याचे उघड परिसरातील रहिवासी अनिल पावडे, श्रीकांत पावडे, रोहन भिडे आणि प्रताप गावंडे यांनी परिसराची पाहणी केली असता मंदिर परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याचे दिसून आले. नाल्यांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून मोठा खड्डा ^राजेश्वर मंदिर हे अकोलेकरांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, मंदिरासमोरील रस्त्यावर गत तीन वर्षांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे दररोज भाविक व नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागतेय.मंदिर परिसरात स्वच्छतेचा अभाव असून नाल्यांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने खड्डा बुजवून परिसराची स्वच्छता करावी. – अनिल पावडे, नागरिक.
Source link
राजेश्वर मंदिरालगत रोडवर 3 वर्षांपासून खड्डा; भाविक त्रस्त:आगामी श्रावण सोमवारी कावडधारकांना मोठा धोका