![]()
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसरात आज पहाटे कंटेनर, टेम्पो आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्यानंतर टेम्पो थेट जवळ उभ्या असलेल्या कारवर पलटी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरही महामार्गावर आडवा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. कसा घडला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी कंटेनर आणि टेम्पोमध्ये भीषण टक्कर झाली. या धडकेनंतर नियंत्रण सुटलेला टेम्पो थेट शेजारी असलेल्या एका कारवर जाऊन उलटला. तर, अपघाताच्या तीव्रतेमुळे मोठा कंटेनर महामार्गाच्या मधोमध आडवा झाला. पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प हा अपघात नेमका सकाळच्या वेळी घडल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले. कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. सुदैवाने प्राणहानी नाही या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. हेही वाचा.. धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि मोटेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा:10 ते 12 गाड्यांची तोडफोड, 45 जणांवर गुन्हा दाखल राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंचे समर्थक आपापसात भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संघर्षामध्ये दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थार यांसारख्या 10 ते 12 महागड्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत राहुल मोटे यांचा पराभव करून तानाजी सावंत आमदार झाले होते, तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वीही दोन्ही गटांतील वादाचे पडसाद अनेकदा पाहायला मिळाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात:कंटेनर, टेम्पो आणि कारची धडक; पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली