![]()
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस दावा करणार आहे, संजय राऊत यांनी काही दावा करू नये. राज्यसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. आता विधान परिषदेला संधी मिळावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे प्रयत्न करत आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांना संधी मिळते का हे सुद्धा बघावे लागले, कारण तुमच्या सर्वांचा मिळून केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कधीतरी अमावस्या-पौर्णिमेला विधान परिषदेमध्ये यायचं आणि जनतेचा एकही प्रश्न मांडायचा नाही, अशी उद्धव ठाकरे यांची कारकीर्द होती. त्यांना मविआ पुन्हा एकदा संधी देते का? हे देखील बघावे लागेल. उद्धव ठाकरेंना आता जर विधान परिषदेची जागा मिळाली तर संजय राऊत यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार म्हणून त्यांना ही जागा उद्धव ठाकरेंना मिळू नये, ते पुन्हा विधान परिषदेवर जाऊ नये असे राऊतांना वाटते. राऊतांचा महिला आरक्षणाला विरोध नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक संसदेत पास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महिलांना आरक्षण देण्याचे काम होत आहे. जे यापूर्वी काँग्रेसला जमले नाही. आज संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहेत. कारण महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी जागा मिळणार नाही. तुम्ही महिलांच्या आरक्षणाला विरोध करत आहात. तुम्हाला लाडक्या बहिणी माफ करणार नाही नवनाथ बन म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या विरोधात मविआत आणि संजय राऊत कायम भूमिका घेत असतात. लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा असे आज संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळतो त्यामुळे महिला सन्मानाने जगत आहे. त्यांचे पैसे बंद करा म्हणायला राऊतांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाडक्या बहिणी माफ करणार नाही. यापूर्वी विधानसभेला आणि मनपाला लाडक्या बहिणींनी तुम्हाला बाजूला केले आहे. राऊतांनी भाजपवर बोलूच नये नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत भाजपबद्दल तुम्ही काही बोलूच नये, जनतेने तुम्हाला विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. रोज सकाळी 9 वाजता कोण भुंकते आणि ती जबाबदारी कोणाला दिली हे जनता बघते आहे.सकाळी उठायचे आणि भुंकात संस्कृती डुबवण्याचे काम राऊत यांनी केले आहे.
Source link
राऊतांना स्वतःच्या जागेची भीती, म्हणून ठाकरेंचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न:उद्धव ठाकरे जनतेचे प्रश्न मांडण्यात अपयशी- नवनाथ बन