![]()
मोहोळ गतवर्षी दि. ३ ऑगस्टपर्यंत १४३.३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. यंदाच्या वर्षी दि. ३ ऑगस्टपर्यंत ७७.२ टक्के पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाची टक्केवारी निम्म्याने घटली आहे. त्यामुळे पेरलेले खरीप जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसामुळे पिके तग धरून आहेत. मात्र दमदार पाऊस नाही झाल्यास खरीप वाया जाण्याची भीती आहे. मागील वर्षी खरीप हंगामापूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र यंदाच्या वर्षी मे-जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात आहे. यंदाचा पावसाळा आणखी दोन महिने पावसाळ्याचे आहेत. त्या दोन महिन्यातील पावसावर जिल्ह्यातील खरिपासह रब्बीचे भवितव्य अवलंबून आहे. मागील वर्षीसह यंदाच्या ही वर्षी जून-जुलैमध्ये पाऊस पडला होता. यंदा उजनी धरणाने शंभरी गाठल्याने कॅनॉल भागासह नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील दोन महिन्याच्या उर्वरित पाऊस काळामध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच वरुणराजा वर्णी लावणार की दांडी मारणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता रब्बी पेरणीसाठी पावसाची आवश्यकता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने जिल्ह्यात दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीसाठी शेतीची मशागत करून ठेवली होती. रब्बी पेरणीची आस शेतकरी उराशी बाळगून आहे. वरूणराजा काय करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बालाजी साठे , शेतकरी, भोयरे कमी पाण्यात जमीन ओलिताखाली आणा मागील वर्षी आतापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे. कमी पाण्यात जादा जमीन कशी ओलिताखाली आणता येईल, असा प्रयत्न करून पाण्याची बचत करावी. -हर्षद निगडे, कृषी अधिकारी मोहोळ
Source link
जिल्ह्यात गतवर्षी 143.3 % पाऊस पडला; यंदा 72.7 टक्क्यांवर मीटर:मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाची टक्केवारी निम्म्यावरच…