![]()
उजनी धरण साखळीतील बहुतांश धरणे १०० टक्के भरलेली असल्याने भीमा खोऱ्यात पावसाचे प्रमाण कायम राहिल्याने उजनी धरण साखळीतील घोड ३,००,०००, खडकवासला १४,३९३ क्यूसेक यासह १६ धरणांतून पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाणी सोडल्याने त्याचा परिणाम दौडच्या विसर्गात होत असल्याने दौडचा विसर्ग १,१६,१२९ क्यूसेक झाला आहे.उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी तून मंगळवार ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ लाख १,६०० क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदीला पूर स्थिती निर्माण होऊन सर्व १७ बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. तर पंढरपूर शहराला पुन्हा महापुरांचे संकट निर्माण झाले आहे. भीमा खोऱ्यात शुक्रवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे दौंडकडे विसर्ग दीड लाख क्यूसेकने पाणी येत असल्याने उजनीतून भीमा नदीत शनिवारी ९० हजार क्यूसेकने विसर्ग सोडल्याने सर्व बंधारे पाण्याखाली गेले होते. रविवारी पावसाने उघडीप दिल्याने उजनीतील सोडलेला विसर्गात घट केली होती. परंतु सोमवारी पाऊस सक्रिय झाल्याने उजनी धरण साखळीतील धरणांतून पाणी सोडल्याने दौंडच्या विसर्गात वाढ होऊन १,१६,१२९ क्यूसेक इतका जमा होत आहे. उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मंगळवारी रात्री १ लाख क्यूसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. तर वीरमधून १३,७७६ क्यूसेकने सोडण्यात आले आहे. यामुळे नीरा नरसिंहपूर संगमावर १,०१,०४८ क्यूसेक पाणी पंढरपूरच्या दिशेने प्रवाहित होत आहे. पंढरपूरचा विसर्ग ६०,८१२ क्यूसेक आहे. त्यात उद्या सकाळपर्यंत नीरा नरसिंहपूरचा विसर्ग मिसळणार असल्याने पंढरपूरचा विसर्ग १ लाख क्यूसेकच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये पुन्हा पूरस्थिती होणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रतिनिधी | पंढरपूर उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आल्याने पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आज पुन्हा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत पुन्हा एकदा व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतरण करावे लागणार आहे. उजनी आणि वीर धरणातून भीमा तसेच नीरा नदीला सोडलेल्या विसर्गामुळे एक आणि दोन ऑगस्ट रोजी भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती. नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले होते. शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील जवळपास १०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी दाखल करण्यात आले होते. रविवारी चंद्रभागेचे पाणी पातळी १ लाख ११ हजार क्यूसेक पर्यंत वाढली होतो. इशारा पातळी ओलांडली होती. मंगळवारी रात्री पुन्हा उजनीचा विसर्ग १ लाख क्युसेक केल्यानंतर भीमेच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन पुन्हा नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहे. दरम्यान वीर धरणातूनही नीरा नदीला १४ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे भीमा नदीचा विसर्ग धोक्याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source link
उजनीतून लाखावर विसर्ग; पंढरीत पूर:पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडल्याने दौंडवरून येणाऱ्या विसर्गात पुन्हा केली वाढ