Headlines

वसंत डावखरे मानहानी प्रकरण:मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; उद्धव ठाकरेंचा कल्याण न्यायालयात जबाब, न्यायालयाने विचारले 35 हून अधिक प्रश्न




2009च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या एका जुन्या खटल्यात, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला जबाब नोंदवला आहे. कल्याण सत्र न्यायालयात दिवाणी दंडाधिकारी संतोष आगे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हा जबाब नोंदवण्यात आला. “मला या प्रकरणात विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे,” असा दावा उद्धव ठाकरे यांनी न्यायालयासमोर केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. या खटल्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि शिवसेनेचे स्थानिक आयोजक रमाकांत देवळेकर हेदेखील आरोपी आहेत. काय आहे हे कथित ‘सीडी’ (CD) प्रकरण? 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून आनंद परांजपे (तेव्हाचे शिवसेना उमेदवार) आणि वसंत डावखरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात लढत होती. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेची एक मोठी जाहीर सभा झाली. या सभेचे आयोजन रमाकांत देवळेकर यांनी केले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या भाषणादरम्यान एक सीडी (व्हिडिओ) दाखवण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता काम करण्याचे’ आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, तो व्हिडिओ ‘मॉर्फ’ (एडिट केलेला) असल्याचा आरोप करत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्या विरोधात मानहानीचा (कलम 500) आणि निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. उद्धव ठाकरेंना विचारण्यात आले 35 प्रश्न न्यायालयात कलम 313 नुसार उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्यांना सुमारे 30 ते 35 प्रश्न विचारले. मात्र, यातील बहुतांश प्रश्नांना ठाकरेंनी “मला या गोष्टी आठवत नाहीत” किंवा “मला माहिती नाही,” अशी उत्तरे दिली. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी आपला थेट संबंध नसून आपली कोणतीही मानहानी करण्याची भूमिका नव्हती, तरीही खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची भूमिका शिंदे गटाचे नेते आणि या सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांनी सांगितले की, “मी केवळ सभेचा आयोजक होतो. सभेची रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, त्या सीडीबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.” दुसरीकडे, तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “परांजपे यांना पोस्टाने एक बंद पाकीट आले होते, ज्यात एक पत्र आणि काही मजकूर होता. त्यांनी याची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली आणि शिंदेंनी ती उद्धव ठाकरे यांना दिली.” एकनाथ शिंदे यांचाही जबाब नोंदवला जाणार या खटल्यातील सर्व 10 साक्षीदार, दोन तपास अधिकारी आणि पंचांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. मूळ फिर्यादी वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. आज उद्धव ठाकरेंचा जबाब नोंदवण्यात आला. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील व्हीसीद्वारे (VC) आपला जबाब नोंदवणार आहेत. तर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे स्वतः न्यायालयात हजर राहून कलम 313 नुसार आपला जबाब नोंदवतील. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून पुढील 2-3 तारखांमध्ये केवळ अंतिम युक्तिवाद होतील आणि त्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. 2009 पासून सुरू असलेल्या या राजकीय आणि कायदेशीर लढाईत आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… अभिजीत दिपके म्हणाले- CJP सध्या राजकीय पक्ष बनणार नाही: दबावगटासारखे काम करू; देशाला नवा पक्ष नव्हे, मजबूत जनआंदोलनाची गरज! नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच, देशातील विविध संस्थांची ‘अकाउंटेबिलिटी’ (उत्तरदायित्व) आणि ‘निष्पक्षता’ परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास, यतीन गोयल , वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रंका हे पदाधिकारी उपस्थित आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *