Headlines

नेरी दिगर येथे पथदिवे बसवण्याची मागणी:अपघातांची मालिका रोखण्यासाठी तातडीने निधी देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा‎



नेरी दिगर (ता. जामनेर) येथील बसस्टँड परिसर व मुख्य मार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची मालिका रोखण्यासाठी आणि नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नागरी सुविधा योजनेअंतर

.

गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून शासकीय विश्रामगृह तसेच नेरी दिगर बसस्टँडपर्यंतच्या रस्त्यालगत पथदिव्यांची सोय करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार आणि आडत व्यापार असल्याने दिवस-रात्र शेतकऱ्यांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पुरेशा प्रकाशाअभावी रात्रीच्या वेळी नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना अतोनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे या परिसरात विशेषतः डिव्हायडरजवळ वारंवार गंभीर अपघात घडत असून काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरी सुविधा योजनेअंतर्गत या संपूर्ण मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे व आवश्यक संरक्षक साधने बसवण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे अपघातांना आळा बसून परिसर सुरक्षित होईल आणि गावाच्या सौंदर्यातही भर पडेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

गांभीर्याने दखल घेण्याची मागणी.. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांमार्फत आवश्यक तो निधी तातडीने उपलब्ध करून पथदिव्यांचे काम लवकरात लवकर मंजूर करावे, अशी आग्रही विनंती नेरी दिगर बसस्टँड परिसरातील नागरिक व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *