Headlines

Hingoli Farmer Loan Waiver: 17000 Farmers E-KYC Pending



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 44 हजार 223 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अद्यापही 17000 लाभार्थी शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेली नाही.योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ला

.

जिल्ह्यातील 44 हजार 223 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 27 हजार 111 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 17 हजार 966 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

प्रलंबित ई-केवायसीपैकी 16 हजार 687 शेतकरी राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. यामध्ये एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांच्या शाखांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्रलंबित ई-केवायसीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

ॲग्रीस्टॅक साठी शिबिर आयोजित करा- जिल्हाधिकारी

शासनाच्या कृषी विषयक योजनांसाठी तसेच कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांचे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *