![]()
उजनी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रातून व डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नि शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे. भीमा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी सुमारे १३८ किलोमीटर आहे. या कालव्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ ते १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचनाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. सुमारे ४५ ते ५० हजार हेक्टर शेती क्षेत्र प्रत्यक्ष कालवा आणि उपकालव्यांद्वारे सिंचनाखाली येते. शेत शिवारातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे. जुलै अखेरपर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. उजनीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी १० जूनपर्यंत सुरू होते. कालव्याचे पाणी बंद झाले तरी शेतकऱ्यांना एक महिनाभर पाणी पुरते. कालव्याला आलेल्या पाण्यातून आेढे, नाले वाहून व शेतातही पाणी आल्याने मुरुन विहिरी, बोअरला पाणी वाढले होते. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे सर्व उभी पिके करपून चाललेली असताना १६ जुलैपासून उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले. अंकोली आणि कुरूल भागात सोडलेले आवर्तन खरीप रोटेशन आहे. पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने प्राधान्याने उभी पिके वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, याची खबरदारी पाटबंधारे विभागाकडून घेतली जात आहे.येवती तलावात पाणी सोडण्यात आले आहे. हेक्टरला करमाळ्यात लाभ हेक्टर पंढरपुरात ओलिताखाली हेक्टर माढा तालुक्यात क्षेत्र हेक्टरला मोहोळमध्ये पाण्याखाली
Source link
कालवा आवर्तनामुळे सव्वा लाख हेक्टरला लाभ:पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यातून सोडल्याने नियंत्रण, पाऊस नसल्याने पिके, खरिपाला हाेती गरज