Headlines

मालवंडीत मान्यतेविना दुसरीपर्यंतचे वर्ग, विद्यार्थ्यांचे भविष्यच टांगणीला:यशविद्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी‎



बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे कोणतीही शासकीय मान्यता प्राप्त नसताना यशविद्या अकॅडमीच्या माध्यमातून अनधिकृतपणे शाळा चालवली जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. शाळेला अद्याप शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली नसतानाही चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली

.

माहितीनुसार, संबंधित संस्थेने नवीन शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्या प्रस्तावाला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नसतानाच विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन वर्ग सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, मागील शैक्षणिक वर्षात पंचायत समिती बार्शीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकड े संस्थेने लेखी खुलासा सादर केला होता. त्यामध्ये आम्ही शाळा चालवत नसून, नागरिकांच्या आग्रहास्तव केवळ नर्सरी ते यूकेजीसाठी प्री-स्कूल सुरू केले असून, इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मंथन, स्पर्धा परीक्षा, संस्कार वर्ग आणि अबॅकसचे वर्ग घेत आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र, यावर्षी प्रत्यक्षात शाळेच्या नियमित वेळेत पहिली व दुसरीचे वर्ग सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. “संबंधित शाळेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर केंद्रप्रमुखांकडून प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संस्थाचालकांना शाळेच्या मान्यतेसंदर्भातील सर्व आवश्यक व वैध कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करून शाळा शासनमान्य असल्याचे समाधानकारक स्पष्टीकरण दिल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. मात्र, मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -गजानन बागड, गटशिक्षणाधिकारी, बार्शी त्यामुळे मागील वर्षी दिलेल्या खुलाशातील माहिती आणि सध्याची प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठा विरोधाभास असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या मते, जर संस्थेकडे अधिकृत शाळा चालवण्याची शासनमान्यता नसेल तर विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग कोणत्या नियमांनुसार घेतले जात आहेत? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार नाही का? तसेच शिक्षण विभागाला याची माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई का करण्यात आलेली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्यात यावी, शाळेच्या वेळेत सुरू असलेले नियमबाह्य वर्ग तातडीने बंद करावेत आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित संस्था व जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष तपास करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही मालवंडीतील नागरिकांनी दिला आहे.

शासनाकडे प्रस्ताव; मान्यतेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू शाळेच्या मान्यतेसाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळेच्या मान्यतेबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळेपर्यंत आम्ही स्वतःच्या खर्चातून शाळा सुरळीत चालवत आहोत. गावातील नागरिकांनीही शाळेला मोलाचे सहकार्य केले आहे. शासनाकडून लवकरच मान्यता मिळेल. हणमंत चव्हाण , संस्थाचालक, यशविद्या अकॅडमी

तपासणी करण्यात आली, दोन दिवसांची मुदत दिली; कागदपत्रे न दिल्यास गुन्हा दाखल करू…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *